दोर चांदण्यांची गुंफल्या हातात अपुल्या दोर चांदण्यांची उलगड ती मिठी फुलवे भोर सू मनांची स्पर्श द्रवताना, कानांत गुंजतात नाजुकसे गुंगलेले मनकवडे होठ मिटमिटती नेत्र न पकडे दक्षिणा क्षणांची उलगड ती मिठी फुलवे भोर सू मनांची मदरुपं साजताना, सुगंध सांगतात सौंदर्य दरवळते अंतराती खोल उडत्या केशांत निथळे थेंबे अमृतांची उलगड ती मिठी फुलवे भोर सू मनांची हर सांज ढळताना, चाहूल रांगतात हास्यलडी खळखुले रातराणी डौल गुंफुन पुनः हात व दोर चांदण्यांची उलगडता मिठी फुलेल भोर सू मनांची ....... ....... गुंफल्या हातात अपुल्या ... दोर चांदण्यांची उलगड ती मिठी ... फुलवे भोर सू मनांची - शशांक.