प्रेमाचा आदरणीय चिखल

प्रेमाचा आदरणीय चिखल

प्रेम वाटणे
प्रेम असणे
प्रेम होणे
प्रेम करणे
प्रेम देणे
प्रेम साचणे
प्रेम सांगणे
प्रेमात असणे
प्रेमात पडणे
प्रेमात डुंबणे
प्रेम अनुभवणे
प्रेम पुजणे
प्रेम भोगणे
प्रेम घेणे
प्रेम मिळणे
प्रेम सोसणे
प्रेम कळणे

ह्या व अशा अनेक प्रेमाच्या अवस्थांनपैकी, प्रेमयुक्त ओढ असल्याची जाणीव होणे - स्वतःला व त्याहीपेक्षा समोरच्याला हेच अर्थपूर्ण !

अथवा अव्यक्त प्रेम असल्याचे निश्चित भाव :
{
स्तब्धता, खामोशी, धारणा, कटाक्ष, अपेक्षा, राग, घुटमळ, अंतर्गत घुसमट, आत्मसम्मान विरुद्ध गरज, प्रतिक्षा, संरक्षित संवेदनशीलता, आराधना, आतुरता, निर्व्याज, निस्वार्थ, आंतरिक विणलेले जग, निष्ठा, 
विश्वास विरुद्ध कालातीत अंधत्व
}

आनंदाच्या लोंढ्यात विरझण पडलेला आनंद
आठवणींच्या रेषेत भेटता येणारी आठवण
इश्काच्या झोकात आपण स्वतःच जपलेले प्रेम
मुखवट्यांच्यां समारंभात लपलेला निरागस चेहरा
कहाण्यांच्या प्रतींमध्ये खोलवरचे केविलवाणे सत्य

तो आनंद,
        ती आठवण,
                 ते प्रेम,
                       तो चेहरा,
                               ते सत्य

- शशांक.

Copyright © 2013- , Shashank Shetye UK or all related affiliates including ShashankShetye.com, All Rights Reserved.

error: Content is protected !!