मराठी हा मराठी की तो मराठी अमराठी ही मराठी ! कुठे राही तो मराठी काय खाई जो मराठी रंगी रंगे तो मराठी की सर्वसंगे तो मराठी ? लक्तरांच्या वर्तकाळी कौतुके नाचवी रेशमी चोळी तो मराठी धन्य माना वा भूतचोळी भाग्य जाणा मोजक्याच योद्धयांच्या कर्मी सैन्याने तग धरावा नवकुशल उसळता रक्त रसिकांनी पाठ दावा जगलो तर टिकवेन मराठी कुठला हा उलटाच बाणा नकळत चढले ऊन इतके शोधाया तीज नाही साउली वणवण भटके मृगजळ शोधे स्वगृही मम् परकी माउली खंत माझ्याही लागे मना वाचवा मराठी काढून फणा परि काय चुकते सांगा ना हो या संतभूमी शिव शंभू भूमी की मर्मभेदी किंकाळी ती खैरलांजीत घडावी काय अर्थ त्या जन्मण्याला व्हा मराठी वा ना व्हा मराठी माणूस म्हणूनी जगा आधी निसर्गासाठी या जीवांसाठी - शशांक.