देश

देश

देश माझा सर्वश्रेष्ठ
सुसंस्कृत संपन्न सुशिक्षित

देश माझा सर्वश्रेष्ठ
अपवाद काही सोडाल तर
देश माझा सर्वश्रेष्ठ
मनात आणाल बनवाल तर

देश माझा सर्वश्रेष्ठ
अनिश्चित असंबद्ध अकस्मात

गरज आहे
खरंच आहे
उसने तरी घ्या रे
गोठलेल्या चेतनांना
विचारांचे निखारे

नको धावा महात्म्यांचा
देवाचा अन रावांचा
गरज आहे अंतरातल्या
खारीच्या त्या वाट्यांचा

देश माझा सर्वश्रेष्ठ
मनात आणाल बनवाल तर

- शशांक.

Copyright © 2013- , Shashank Shetye UK or all related affiliates including ShashankShetye.com, All Rights Reserved.

error: Content is protected !!