तुझे शून्य आता आयुष्य फक्त एक शून्य फक्त - एक शून्य तू निघून गेलीस आणि तू आयुष्यात निर्माण केलेल्या शून्याने आयुष्यच एक शून्य करून टाकले ! तू म्हणशील शून्यच ते, मग मिळवं कोणतेतरी दुसरे आयुष्य त्यात व बनव नवीन विश्व ! पण चुकतेस. चुकतेस तू. कारण, विसरते आहेस की, - शून्याचेही असतात दोन प्रकार - एक बेरजेचे आणि एक गुणाकाराचे ! तू बहाल केलेले शून्य बेरजेचे नाही ते गुणाकारातले आहे त्यात कोणाचेही आयुष्य मिळवले तरी शून्य ते शून्यच ! उलट मिळवलेले आयुष्यदेखील त्या शून्यात विरघळून जायचे आणि तुझे शून्य द्विगुणित व्हायचे ! त्यापेक्षा तू बहाल केलेले आयुष्यरूपी शून्यच नष्ट करतो फक्त एकच मागणी आहे या शून्याची पुनरावृत्ती करू नकोस ! कारण सर्वच माझ्यासारखे नसतात काहीजण फांदीऐवजी मुळावरच घाव घालतात. - शशांक.