अधून मधून किंचित लाजून अजून सजून मुरडत अशी न लपून छपून यावे कवेत अधून मधून श्रावणाची मेहरबानी इंद्रधनुष्य आसमानी ओलीओलेती लावण्यखाणी दवबिंदू गुलाबीपाणी ओरंघळे कटीकमानी बिलगावे चोरक्षणी ग्रीष्माचा कहर गुलमोहर बहर यौवनाची लहर फुत्कारते जहर तहानले शहर मिठीतच ठहर शिशीर बोच रे पवन नाच रे उबदार तन रे हरपत भान रे चुंबन डसरे पहाट पसरे ऋतू वा मास सण वा खास रात वा दिस क्षण वा तास सुख वा त्रास शव वा श्वास किंचित लाजून अजून सजून मुरडत अशी न लपून छपून यावे कवेत अधून मधून - शशांक.