चक्र हृदयातील कळांना शब्दात का रचावं || ३ || शब्दांमुळेच होती अर्धे अधिक घाव उंबरया वरी तू जरी अडखळत खेट || ३ || तू उंबरया पारी यावे हेच खूप मोठ पेल्यात माझा मेला सज्जनाचा भाव || ३ || रिचवून पुनः जरासा आणतो मी आव काढून वेळ आली आत्म्यास भू भेट || ३ || अधरांवरी परी त्या परके अधीर होठ वळणावरी चुकीच्या चुकत जातो डाव || ३ || खेळतो तरी की ही जिंकण्याची हाव कित्येकदा मनाशी बुद्धीचे द्वंद्व युद्ध || ३ || विवेकाला फाशी हसला तो बद्ध बुद्ध काय म्हणूनी काय पुसशी काय माझे नाव || ३ || जन्मतो पुनः पुनः मी कर्म भोग राव - शशांक.