मनाचे श्लोक by शशांक कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं बसलं ना, की दाबतात नी दबल की म्हणतात हा घे वाजीव पावा पण तरी कसं आहे ना भावा उठलं की नमस्काssssर करतात नी म्हणतात साहेब पहिलं आम्हालाच पावा कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं प्रेमाशिवाय इतर कुठलीही गोष्ट करताना heart टाकू नये कारण कसं आहे ना भावा बुद्धीबळाच्या पटावर तीच प्यादी अचानक मात खातात जी विश्वास आणि भावनेन चालतात कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है आज जिथे तू आहेस उद्या तिथे ते असतील तेंवा त्यांना कळलं तुला जसं वाटल असलं ते पण कसं असतं ना भावा ते पहायला तू तिथं नसशील जर आलीच तर तुझी आठवण असेल कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है खुराड्यात राहताना मनात समुद्र खवळला असेल तरी चेहऱ्यावर सौम्य शांतता ठेवावी कारण कस आहे ना भावा समोरच्याला मग आसुरी आनंद होण्याऐवजी त्रास होतो आणि तो त्रास उच्चकोटीला पोहोचला की तो एखादी घोडचूक करतो कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं माज दाखवणारयाला रस्त्यावर असल्यासारखे direct नाही भिडायचे कारण कस आहे ना भावा त्याच्या power points ना ओळखून त्यांना equivalent powers place केली की त्याला मात आपोआप मिळते कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं वावरताना आपलं मन दुखत असलं तरी भोवतालची मन solve करून, आपलं घोड सरकवायचं पाप पुण्याचा सवाल नाही का माहित आहे का भावा मन दुखली की त्यातल्या विकृत्या सतत नको नको तिथं पाझरत रहातात नी त्याचा double त्रास आपल्यालाच होतो कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं शब्द जपून वापरायचा कारण कसं आहे ना भावा आत्मे केलेलं विसरतात नी बोललेलं लक्षात ठेवतात कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं आपल्याला समोरचा आपल्यासारखाच वाटतो पण काय आहे ना भावा म्हणूनच आपण फसतो कारण तो वाटतो तसा नसतो कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं facts ला facts म्हणून पहायचे, त्या भोवती emotions ची साडी नाही गुंडाळायची कारण कसं आहे ना भावा दहा facts असतील तर त्या भोवती शंभर खरया stories बनू शकतात कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं अवघड गणित challenging असतात, पण काही किचकट गणित option ला टाकलेली च बरी असतात कारण काय आहे ना भावा ह्या भूतलावर आपला वेळ आणि उर्जा ही लिमिटेड आहे ती व्यवस्थित खर्च नाही केली तर डोक आणि आत्म्याचा भूग्गा होतो कसं आहे ना भावा, दुनिया इचीत्र है इथं दौडायचं, पण गरजेचे आणि नियमांचे pressure point दाबत हक्काचा रस काढत, फायद्यात कारण कसं आहे ना भावा जेवा तुला तहान लागते तेवा तीच लोक तुला नियमांच्या pipeline चे जाळे दाखवतात <Will add more> - शशांक.