असहाय्य्यता

असहाय्य्यता

रानी पडली ठिणगी वाऱ घोंगावले उगे
दोष द्यायचा कुणाला पान आपुले ही सुके

बे होष शूर वीर भिडे सैन्य वा कपट
भेदोन छेद देता घेरे ते चक्र व्युह

घीर घीर गिधाड ही ओसाड हे वाळवंट
धडपड व्यर्थ का रे हा छाटलेला देह

मुंगी चालता परत मार्गी शिंपडले पाणी
अणु अंतर सतत तरी बेसुमार क्लेश

किती छदमी उदमी जग बेमालूम वर आणि
पुसताना जन्म जाई एक नशिबाची रेष

रानी पडली ठिणगी वाऱ घोंगावले उगे
दोष द्यायचा कुणाला पान आपुले ही सुके

- शशांक.

Copyright © 2013- , Shashank Shetye UK or all related affiliates including ShashankShetye.com, All Rights Reserved.

error: Content is protected !!