प्रेमाचा game पट तोच असे तरी खेळ होई आगळा भाव तोच असे तरी आमचा जगावेगळा भले भले खपले तिथे तू न मी काय राहु?? अरे, प्रेमाच्या गेमाचा नेम नाही रे भाऊ चिंटूच्या दुचाकीची साखळी का पडे सतत? चिंगीच्या चालण्याला दुप्पट वेळ का लागत? गणित लॉजिक हरलं, कट्टयावरचा दादा म्हणे - affectionच कळलं दिल म्हणे, दादा - कसं कसं सरकल ते पूsढे पूsढे पाहू खरय, प्रेमाssच्या गेमाssचा नेम नाही रे भाऊ A ला P नी M ला Y, कुणाचा विशालकोन तर कुणाला काय बात नाही केली, तरी आपली अदृश्यss तार जाय सुक्का म्हणे इतक्या तारा चुकवून नजर मारु, तर तारेवरची कसरत काय? सीनियर म्हणतो - वेड्या, जोड्याsने खाल्याशिवाय सुटत नाहीत जोड्या दिल म्हणे, तात्या - वेळच सोडविल जाऴ तोवर नियमात राहु! अरे, प्रेमाssच्या गेमाssचा नेम नाही रे भाऊ अचानक कधीतरी कधी तरी हळुहळू हृदयाचे ठोके त्यांचे अस्ति त्व देई कळू ओझरते बोल वाटे जुनी पहचान विलक्षण ओढ नाही काळवेळ भान होते मग जाण का ही हुरहूर आयुष्याचा मोड आता तीन शब्द दूर मन दिल सारे लागे मुक्त पणे धाऊ प्रेमाच्या गेमाचा नेम नाही भाऊ काय रे सारखं? इकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ पहिले हात सोड माझा, राहतो इथे भाऊ missed call चे थवे, Orkut-FBवर चढे profiles नवे तरी तिला वाटे हवे हवे, त्याचे फोड नवे नवे ताई म्हणे - बघ ह बाई, possesive तर नाही? दिल म्हणे - ताई, आपकी सर गई! धुंदीत आम्ही हि जरा मन सोक्त न्हाऊ? प्रेमाच्या गेमाचा नेम नाही रे भाऊ तुझी माझी जोडी मग लग्नाची बेडी कुठे सर्व आलबेल, कुठे होई धुडगूस कुठे पाटी नवी कोरी, कुठे पुढचा गद्य पाठ काका म्हणे - "प्रेम आगीचा लोळ तर संसार निखारेमार्ग झोकून राख होणे सोपे पण इथे राख होणे नाही नी मार्ग सोडणेही नाही" दिल म्हणे - काका, सल्ला आता राखा. नांदा सौख्य भरे राहु. प्रेमाच्या गेमाचा नेम नाही रे भाऊ खेळ असा रंगलेला कुणी घऱ हारलेला कुणी घऱ जिंकलेला तरी मार्ग दाख वावा नवी प्यादी चालताना जरी भाव वाटे वेगळा अन खेळ होई आगळा तरी पट तोच जुना मूळा, राही, पट तोच जुना मूळा खपलो तरी रोऊ. दिपस्तंभ होऊ… कारण, … प्रेमाच्या … गेमाचा… नेम नाही रे भाऊ! - शशांक.