क्षणघात अशा कातरवेळी उगीचच डोळी तरारलं पाणी लपवाया पायी पाहिलं मी नभी परी चंद्रहि ढवळी वरी भावनांच्या सरी मंद मंद हे तरंग आता उफाळे उफाळे लाटांचे तडाखे खाई मनाचिया बांध कसा खचला खचला.... खपली निघाली घाव झाला ताजा ताज्या घावाने घाव हाणला हाणला.... मनाचिया बांध माझा तुटला तुटला ! घात कसा झाला सत्य नग्न झाले लोकनचिये कानी कुजबुज झाली माझी तमा नाही तमा तुझी आहे तुझ्या तमेपयि जीव झिजला झिजला तगमग माझी पाहुनी शशांक कसा नभामधी आता दडला दडला - शशांक.