एक heart surgeon की मौत

एक heart surgeon की मौत

कुशल कारागीर तो
स्वप्न एक धरीले मनी
असाध्य ते साध्य करणे
ह्याच आणि ह्याच जीवनी

स्वप्न नव्हे ध्यास झाले
ध्यास हेच ध्येय्य झाले
ध्येय्य जिद्दीने उपजले

परी स्वप्नाचेही मोल होते
कारागीरचे खिसे खोल होते
दिस रात एक केले
काम हाच प्राण झाला
प्राणावर ताण आला
अन् कामानेच प्राण नेला

लोक हो, नियतीची थट्टा विचित्र होती
प्राण वाचवणेच त्याची कारगीरी होती
कुशलता ज्या रोगावर होती
त्यानेच झडप घातली मोठी

स्वप्न काय होते त्याचे?
एक अतिकुशल घरकूल उभारण्याचे
झुंज़ द्यावया त्या रोगाला
ज्यात होता निपुण तो
मृत्युच्या दारी फडफडणर्‍या पाखरांना
पुन्हा झेपावाण्या पुरवी बळ जो

घरकूल जरी एकमेवाद्वितीय
कुशी सर्व पाखरांना
कारण दारी मृत्युच्या सर्व
कशी एकसमान टडप तात ना

दिस रात एक केले
काम हाच प्राण झाला
प्राणावर ताण आला
अन् कामानेच प्राण नेला
कुशलता ज्या रोगावर होती
त्यानेच झडप घातली मोठी

वाटले, स्वप्ने अपूर्ण राहिली
आणि पाखरे वंचित राहिली
पर झुंज़ तेवतच होती
त्याच्या भार्ये च्या रूपी

परी स्वप्नाला ही मोल होते
अजूनही खिसे खोलच होते
दुनियाच ती! केला बाजार त्याचाही
स्वप्न पुर्ती करता, देतो म्हणाले पैसेही
परी घरकूल होईल आमचे
घरकूला चे नावही आमच्याच ब्रॅण्डचे
जाणीव होती त्या माऊलीला
अपुर्णहून पुर्ण कधीही चांगला
मग त्या पुर्ण चंद्रावर नाव कोणीही का कोरेना
रात्रीला प्रकाश मिळेल सगळ्यांनाच
कर्म मोठे, फळ नव्हे
उपयोग उपयोगाचा, नाव नव्हे

घरकूलाची कामे पुर्ण झाली
पण इतक्यावर थांबेल तर दुनिया कसली
उद्घाटनाला लोक जमली
प्रसिद्धीचा बाजार मांडला
स्वप्न पाहणारी डोकी खाली
पैसेवालि स्टेज चढली

जाऊदे कारागीर हो,
पुन्हा झेपावणआरी पाखरे
ही तुमची च देण हो
आम्हाला तुमच्या स्वप्नांचीच आहे गरज
पण त्याही पेक्षा आहे तुमचीच गरज
कारण पाखरू फडफडताना
ब्रँड वाले असंख्य असतील
पण केविलवण्या आसवांनी
शोधत होती नजरा ज्यास
तो निपुण कारागीर
एक होता, एकच आज

- शशांक.

Copyright © 2013- , Shashank Shetye UK or all related affiliates including ShashankShetye.com, All Rights Reserved.

error: Content is protected !!