अर्धविराम भेटला वळुनी तो पापन्या पालवुन गेला अंतरातिल भिंग माझें तो चकचकीत शो-पीस झाला तेच डोळे तेच शब्द तो मोजक्यात तृप्त झाला पोरके नाते माझे तो कधिच मुक्त झाला उन्हाच्या त्या सावलीचा तो बोडका व्रुक्ष झाला मी व्याकुळ चातक असता तो प्याला शुष्क झाला हवेचा मंद झोका तो कसा कठोर आतां तावदाने मी हृदाची तो दिशा बदलून होता भेटला नसतास मजला तो एक स्वप्न होता कुरवाळिले मी दिलाशी तो झटकून उभा होता काळ माझा अडकून असता तो नवीन ओढईत गेला तेच जुने गाणे माझे तो नवे गुणगुणत गेला - शशांक.