घुसमट श्वास माझाच मजला अवजड होत जाई आज माझीच मजला घुसमट आत खाई कोंदटे हवा कामना, उरे मतलबी मी गोठवे दिवा भावना, क्षरे एक छबी मी नास माझाच वसला सरकत ही चढाई आज माझीच मजला घुसमट आत खाई रोपटे जरी या वनी भले रुजवली मी सांकडे दरी या धरी तळे वसवली मी व्यास माझाच वजला पसरत आमराई आज माझीच मजला घुसमट आत खाई डाग माझाच ठसला उजळत रोषणाई रास माझाच फसला थिरकत पेशवाई फास माझाच कस्सला उसवत मान्मनाई ऱ्हास माझाच असला उधळत भारपाई श्वास माझाच मजला अवजड होत जाई आज माझीच मजला... घुसमट… आत... खाई… - शशांक.